Thursday, March 8, 2012

बाजीराव पेशव्यांच्या लढाई वरील व्याख्यान आणि श्रोते

बाजीराव पेशव्यांच्या लढाई वरील व्याख्यान आणि श्रोते

पुण्याच्या केसरीवाड्या मध्ये परवा पालखेडच्या लढाई वर व्याख्यान होते. संध्याकाळी ६.३० ची वेळ. ७५ % लोक हे निवृत्त (वय वर्ष ६० आणि त्यावरील ) . हे लोक बघून मला फार वाईट वाटले. बाजीरावाचा पराक्रम हा तरुण आणि लहान मुलांनी ऐकावा आणि त्यावरून तसा पराक्रम करून दाखवावा हा माझ्यामानातील एक समज . थकलेले ते चेहरे बघून आणि त्यांचा व्याक्यानाला यायचा उद्देश काय असावा याचे माझे एक observation  असे कि कुठून तरी वेळ घालवणे , संध्याकाळाचे २/३ तास मस्त जातील म्हणून.

काही लोक उशिरा येत होते , हॉल भरला तरी तिथेच उभे राहून कुठे जागा मिळेल याचा शोध .
लोक लाज्जेस्तव काही तरुण बिचारे उठून या लोकांना जागा देत होते .

आता लोकांची मानसिकता इतकी वाईट कि समोरचा वक्ता बोलत असताना ८ वाजले आणि लढाई संपली असे सांगताच ५०/६०  एक  लोक उठून निघून गेले . वक्त्याला अजून बराच काही विश्लेषण करायचे होते पण हे लोक काहीही विचार न करता त्याच्यासमोरून जात होते. इतके दुर्दैवी दृश होते कि बस !



मला वाटत होते कि हॉल चे दर बंद करावे (जसे सूर्याजीने सिहगडावरून  दोर कापले )
वक्ते सुधा काही फालतू नव्हते , एक होते निवृत्त मेजर  जनरल आणि एक होते इतिहास सैशोधक.

तात्पर्य काय तर विषय वेगळा , वक्ते वेगळे असा जर प्रकार असेल तर त्या व्याख्यानामधून जेवढा effect मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आणि ज्याला खरच काही त्यातून घ्यायचे असेल तर त्यालाही ते  काही नीट मिळत नाही आणि २/३ तास सर्वांचा छान timepass होतो.


About Me

PUNE, MAHARASHTRA, India
From India,Working as a senior software engineer